कोल्हापूर :

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

इ. 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे,सर्व माध्यम, अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatel.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक याप्रमाणे- ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी- 25 ऑगस्टपर्यंत, वेळ 23.59 वा. पर्यंत, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे- 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 – 10 ऑक्टोबर रोजी स. 10.30 ते दु. 13 वा., शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 – 10 ऑक्टोबर रोजी दु. 14 ते सायं. 16.30 पर्यंत असा राहील.

Share

You missed

error: Content is protected !!