गोकुळच्‍या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचा सत्कार

कोल्‍हापूरः

प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्‍या शिखरावर पोहचविण्‍यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्‍या सेवेतुन निवृत्‍त होत आहेत. याची मनाला खंत वाटत आहे. तथापि संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्‍यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्‍त व्‍हावे लागते. अशा कर्मचा-यांच्‍या कष्‍टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल असे प्रतिपादन चेअरमन मा.विश्‍वास पाटील यांनी गोकुळच्या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या सत्‍कार प्रसंगी केले. सदरचा कार्यक्रम गोकुळ दूध प्रकल्‍प कार्यस्‍थळावरील स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर. यांच्‍या स्‍मारकाजवळ आयोजित करण्‍यात आला होता.

पुढे बोलताना श्री. पाटील म्‍हणाले या कर्मचा-यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्‍या काळात अल्‍प पगारावर कष्‍टाचे काम केलेले आहे. सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांनी सत्‍संगाची जोड देऊन उर्वरित आयुष्‍य घालवावे असे चेअरमन मा.विश्‍वास पाटील यांनी सांगून, या कर्मचा-यांच्‍या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्‍यांनी पुढील आयुष्‍यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्‍य लाभो अशा शुभेच्‍छा दिल्‍या. सेवानिवृत्‍त कर्मचा-यांमध्‍ये ज्ञानदेव पाटील, शिवाजी पाटील,जगन्‍नाथ कांबळे, जगदिश सावर्डेकर, शंकर शिरगांवे, उमेश शेळके, आनंदा मगदूम, आनंदा खोत, ताना‍जी मगदूम, प्रकाश पाटील, बळवंत परीट, श्रीरग पाटील, पांडूरंग कांबळे, केशव पाटील, सदाशिव खोत, बळवंत पाटील, प्रकाश खोत, साताप्‍पा चौगले, बसगोंडा पाटील, सुरेश सोलापूरे, चंद्रकांत झिरले, यशवंत पोवार, बंडा मोहिते, पंडीत पाटील, श्रीमती मंगल माने या २५ जणांचा समावेश आहे. यांचा चेअरमन श्री. विश्‍वास पाटील व उपस्थित संचालकांच्‍या हस्‍ते गोकुळच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला.

      याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित  तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी  पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्‍त कर्मचारी उपस्थित होते.
Share
error: Content is protected !!