कोल्हापूर :

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील व संचालक मंडळाने आज गुरुवार (दि.३०) रोजी महाराष्‍ट्र राज्‍याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्‍थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री कोल्‍हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्‍हणाले की, गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत निर्माण केलेले जाळे आणि त्यातील व्यवस्थापन कौशल्य हे कौतुकास्पद आहे. गोकुळ ही संस्था सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. दूग्ध व्यावसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांची हित साधण्याचे प्रभावी काम गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे केलेले आहे. म्हणूनच गोकुळचे ग्रामीण विकासामध्ये मोठे योगदान आहे.अशा संस्‍थेचा विस्‍तार होणे काळाची गरज आहे व गो‍कुळच्‍या प्रस्‍तावित भोकरपाडा एम.आय डी.सी. मधील भुखंडा संदर्भातील सदरचे सर्व प्रस्‍ताव मंजुर करण्‍याचे आश्‍वासन दिले.

      यावेळी संघाचे चेअरमन  विश्‍वास पाटील (आबाजी) यांनी  आमचा संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहयोगाने सहकारी तत्वावर दुग्धव्यवसाय करणारी संस्था आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणेचे काम संघ करीत आहे. सध्‍या मुंबई मध्‍ये दररोज ८ लाख ५० हजार लिटर्स प्रतिदिन इतकी मागणी आहे. व मुंबई शहरामध्‍ये दूधाच्‍या  विक्रीमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे यासर्वबाबीचा विचार करून व भविष्‍याच्‍या दृष्‍टीने संघाचे विस्‍तारीकरण होणे गरजेचे आहे. भोकरपाडा येथील भूखंडा संदर्भा तांत्रिकदृष्ट्या येणाऱ्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर करून संघास भुखंड प्रदान करण्‍यासाठी सकारात्‍मक चर्चा झाली असे म्हणाले.

यावेळी माजी चेअरमन संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, सुजित मिणचेकर, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,मुंबई शाखेचे व्‍यवस्‍थापक दयानंद पाटील, सिव्‍हीलचे व्‍यवस्‍थापक प्रकाश आडनाईक उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!