रिक्त कंत्राटी पदांच्या भरतीबाबत हरकती असल्यास 20 जानेवारीपर्यंत नोंदवाव्यात

कोल्हापूर :

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाच्या रिक्त असलेल्या कंत्राटी पदांची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये स्टाफ नर्स या रिक्त असलेल्या कंत्राटी पदाची छाननी चालू असून उर्वरित रिक्त पदांची छाननी झाली आहे. यामध्ये पात्र, अपात्र यादी दि. 17 जानेवारी 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

यामध्ये ज्या उमेदवारास हरकती आहेत त्यांनी 20 जानेवारी पर्यंत आपल्या हरकती राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, कोल्हापूर कार्यालयास व्यक्तीश: नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी केले आहे. तद्नंतर येणाऱ्या हरकतींची नोंद घेतली जाणार नाही.

Share
error: Content is protected !!