विश्वास पाटील (आबाजी) अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत : रक्तदान शिबिरात ५७५ रक्तदात्यांचे रक्तदान

कोल्हापूर :

गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील ( आबाजी) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमअंतर्गत शिरोली दुमाला (ता. करवीर ) येथे मंगळवारी (दि. १८) आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.शिबिरात ५७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

यावेळी विश्वास पाटील ( आबाजी), सौ.ऊर्मिला पाटील, तुकाराम पाटील, सरपंच सचिन पाटील व संपूर्ण पाटील कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अर्पण ब्लड बँक व श्री महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.

यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, कर्णसिंह गायकवाड,अजित नरके, चेतन नरके,बयाजी शेळके,मुरलीधर जाधव प्रकाश पाटील, एस.आर. पाटील, अमरसिंह पाटील, क्रांतिसिंह पाटील,सत्यजित पाटील, बाबासाहेब देवकर, अमर पाटील, कुंभी कारखाना संचालक किशोर पाटील, दादासो लाड , नंदकुमार पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, बाजीराव पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, बुद्धीराज पाटील, एस. डी. जरग, रयत संघाचे संचालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, गौरव समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Share
error: Content is protected !!