गोकुळ’ तर्फे केमिस्ट असोसिएशन अध्‍यक्ष पदी निवड झाल्‍या बद्दल शिवाजी ढेंगे यांचा सत्‍कार

कोल्‍हापूर :

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये कोल्‍हापूर जिल्‍हा केमिस्‍ट असोसिएशनच्‍या अध्‍यक्ष पदी निवड झाल्‍या बद्दल शिवाजी सखाराम ढेंगे यांचा सत्‍कार संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील हस्‍ते करण्‍यात आला. तसेच संघाचे सेवानिवृत्‍त कर्मचारी श्री.माधव कसरकर यांचा सत्‍कार संचालक बाबासाहेब चौगले तर श्री.मोतीराम डोईफोडे यांचा सत्‍कार संचालक चेतन नरके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

      सत्‍कारावेळी बोलताना शिवाजी ढेंगे म्‍हणाले कि  जिल्हा केमिस्‍ट असोसिएशनची स्थापना वसंतराव मोहिते यांनी केली. जिल्‍ह्यातील फार्मा स्‍टोअर यांचे  शासनस्‍तरावारील असाणारे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावू त‍सेच सर्वतोपरी सहकार्य करू. जिल्‍ह्यातील सर्व केमिस्‍ट लोकांच्‍या हिताचे निर्णय घेऊ.  राज्‍यातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्‍य असा संस्‍थेमार्फत माझा सत्‍कार करण्‍यात आला यांचा मला अभिमान आहे.   

      याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित  तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी  पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके,अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Share
error: Content is protected !!