करवीर :

मांजरवाडी (ता.करवीर) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, एम.जी.पाटील (धुंदवडे) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य साताप्पा चौगले यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.संजीवन ब्लड बँकेच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरात सुमारे ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी सरपंच प्रकाश कांबळे, शहाजी वीर, राजाराम गोते सर , सुभाष येरुडकर, प्रकाश गोते, प्रदीप वीर व ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजक साताप्पा चौगले यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.

Share
error: Content is protected !!