यशवंत बँकेच्या कळे शाखेत ठेवीत प्रचंड वाढ  : शाखा स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित  :  अध्यक्ष एकनाथ पाटील

करवीर :

यशवंत  सहकारी बँकेची कळे शाखा  स्वमालकीच्या इमारतीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर  स्थलांतरित झाली ,या शाखेत  गेल्या चार वर्षात ठेवी मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, यामुळे सभासदांचा  बँकेवर विश्वास वाढला आहे ,अशी माहिती अध्यक्ष एकनाथ पाटील दिली.यावेळी यशवंत सहकारी बँकेची कळे शाखा  स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित झाली.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले   बँकेच्या मुख्य शाखे सह दहा शाखा आहेत.आता  कळे सह चार शाखा स्वमालकीच्या इमारतीत सुरू आहेत. सर्व  शाखा ही  लवकरच  स्वमालकी  इमारतीत  सुरू होणार आहेत . असे सांगून  व्यवसाय वृद्धी वर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.

बँकेला  संपलेल्या मार्च 2021 या आर्थिक वर्षात  2 कोटी 23 लाख ढोबळ नफा  झाला असून,  गतवर्षीपेक्षा यंदा 19 कोटी 4  लाखांनी ठेवी वाढून एकूण 125 कोटी  32 लाखाच्या  ठेवी  झाल्याची माहिती सांगितली.यावेळी   दीडशे कोटी च्या ठेवीचे  उद्दिष्ट असल्याचे  अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले . यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, व संचालक उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले कोरोना काळातही  गतवर्षीपेक्षा बँकेने  सर्व पातळीवर  उत्तम कामगिरी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 19 कोटी चार लाखाने  ठेवी वाढून 125 कोटी 32 लाखाच्या ठेवी झाल्या  आहेत. 78 कोटी 76 लाखाचे  कर्जवाटप केले आहे.150 कोटी  25 लाखाचे खेळते भांडवल असून ,  शून्य टक्के एन. पी. ए. आहे.  एकूण व्यवसाय दोनशे पाच कोटी नऊ लाखाचा झाला आहे. निव्वळ नफा एक कोटी, 21 लाख, 52 हजार झाला असून,
ढोबळ नफा 2 कोटी 23 लाख झाला आहे.मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ  योजनेसाठी  सुमारे शंभर तरुणांना 9 कोटीच्या वर   कर्ज देऊन  त्यांना  पायावर उभे केले आहे. बँकेच्या वतीने सोनेतारण कर्जा ला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच  ग्राहकांना एसएमएस बँकिंग, आरटीजीएस, एटीएम अशा सुविधा उपलब्ध केल्या असून बँकेचे
स्वतंत्र  डी. आर. एस.साईट  केली असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. कांबळे, संचालक आनंदराव पाटील,सर्जेराव पाटील, सुभाष पाटील ,बाजीराव खाडे ,एस.के.पाटील, संग्राम भापकर, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील,सर्व  संचालक, शाखाधिकारी एच एस पाटील,कर्मचारी,सभासद  उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!