धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ
मिळविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ


कोल्हापूर :

जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना चार ठिकाणी भात विक्री नोंदणी करण्याकरिता व धान उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी त्वरीत संस्थेच्या सात कार्यालयांशी अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, श्रीशाहू मार्केट यार्ड, कांदा बटाटा लाईन, कोल्हापूर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लज व कोल्हापूर येथील बाजार समिती कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे.

राज्य शासनाचे आधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता दि.महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीची कामे पाहते. हंगाम 2021-22 करीता शासनाने एफ.ए. क्यू प्रतीच्या धान (भात) करीता 1 हजार 940 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे, त्या शेतकऱ्यांकरीता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे.

त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यांत सात ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरु केली असून 1) चंदगड तालुका खरेदी विक्री संघ लि, मार्फत, तुर्केवाडी, 2) चंदगड तालुका सहकारी कृषीमाल फलोत्पादन संघ लि, अडकूर, 3) आजरा किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, 4) राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या-सरवडे, 5) भुदरगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ गारगोटी (भुदरगड), 6) दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि-जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व 7) कोल्हापूर जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ कोल्हापूर-बामणी तालुका कागल येथे नोंदणी केंद्रे सुरु केली आहेत.

धान खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. नोंदणीकरीता शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम 2021-22 मधील धान (भात) पिक लागवडीची नोंद असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबाराचा व 8-अ चा मूळ उतारा प्रत,  आधारकार्ड व बॅक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.

Share
error: Content is protected !!