16 नोव्हेंबरपासून ‘ गोकुळश्री स्पर्धा ‘ : जास्‍तीतजास्‍त दूध उत्‍पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्‍यावा : चेअरमन विश्‍वास पाटील

कोल्‍हापूरः ता.०१. गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षीत करुन दुग्ध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गेल्या २७ ते २८ वर्षापासून सुरु केलेली आहे.

      सदरची स्‍पर्धा हि दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता घेतली जाणार आहे या स्‍पर्धेसाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ अखेर दूध संस्‍थे मार्फत आपली नावे नोंद करावीत. स्‍पर्धेमध्‍ये म्‍हैस १ ते ३ व गाय १ ते ३ क्रमांक काढले जाणार आहेत. स्‍पर्धेचे नियम व अटी संस्‍थेना परिपत्रकाद्वारे पाठवले आहेत. तरी जास्‍तीत जास्‍त म्‍हैस व गाय दूध संस्‍थांच्‍या दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी संघाच्‍या वतीने आव्हान केले आहे.
Share

You missed

error: Content is protected !!