शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही : डॉ. बी. पी. रोंगे (गगनबावडा तालुक्यातील शिक्षकांच्या घेतल्या प्रत्यक्ष भेटी )
गगनबावडा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांनी गगनबावडा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या जाणून घेतल्या.
डॉ. रोंगे यांनी माननीय दत्ताजीराव मोहिते-पाटील महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तिसंगी, श्री यशवंत माध्यमिक विद्यालय, असंडोली, माननीय उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय, असळज, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा आणि श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, शेणवडे यांसह अन्य शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. रोंगे म्हणाले, “शिक्षकांसमोर टीईटी, जुनी पेन्शन योजना यांसह अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा मी अभ्यास केला असून ते शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध आहे. शिक्षकांनी सेवा करण्याची संधी दिल्यास जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.”
डॉ. रोंगे यांच्या प्रत्यक्ष भेटींमुळे शिक्षकांशी थेट संवाद साधला जात असून, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही यांच्याशीही चर्चा चर्चा होत आहेत.
