समर्थनगरमध्ये डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा निर्धार :
( शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांचा वाढता प्रतिसाद; पत्नी प्रेमलता रोंगे यांचा झंझावाती दौरा)
पंढरपूर :
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना डॉ. बी. पी. रोंगे यांच्या उमेदवारीला शिक्षकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. समर्थनगर परिसरात झालेल्या बैठकीत विविध शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरांनी डॉ. रोंगे यांच्या उमेदवारीला समर्थन देत त्यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.समर्थनगर येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी डॉ. रोंगे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. यावेळी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. रोंगे यांच्या पत्नी सौ. प्रेमलता रोंगे यांनीही शिक्षकांशी संपर्क साधत प्रचाराला झंझावती सुरुवात केली आहे. विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि डॉ. रोंगे यांच्या भूमिकेची माहिती देण्याचा प्रयत्न त्यांच्या दौऱ्यातून केला जात आहे.शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणे, शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांचा अभ्यास करून ते शासनदरबारी मांडणे आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रयत्न करण्याची भूमिका डॉ. रोंगे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या उमेदवारीला विविध शिक्षक संघटनांमधून मिळणारा प्रतिसाद आगामी निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा ठरणार आहे.
डॉ. बी. पी. रोंगे हे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण पद्धतीने शासनस्तरावर मांडणी करण्याची भूमिका त्यांनी अलीकडील कार्यक्रमांमध्ये व्यक्त केली आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा वाढता बोजा, शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज यावर त्यांनी भर दिला आहे.
“शिक्षकांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची गरज”
शिक्षकांच्या समस्या केवळ निवेदनांपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांचा अभ्यास करून शासनाकडे ठोस स्वरूपात मांडणी करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. बी. पी. रोंगे यांनाच निवडून देण्याचे आवाहन सौ. प्रेमलता रोंगे यांनी केले.
