करवीर :

दरवर्षी नावीन्यपूर्ण वं आकर्षक घरगुती देखावा करणारे सांगरुळ ता. करवीर गावचे संभाजी नाळे संभाजी नाळे यांच्या संकल्पनेतून हरीओम नाळे व मालोजी नाळे या नाळे कुटुंबीयांनी यंदा राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हा आकर्षक देखावा साकारला आहे.

सदरचा देखावा पूर्ण करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागला असून १२ बाय ११ फूट जागेत त्याची उभारणी करण्यात आली आहे. देखाव्यासाठी सुमारे चार टन वजनाचे साहित्य वापरण्यात आले आहे तसेच प्रतिकृतीमध्ये तब्बल तीन हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आला आहे.

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची प्रतिकृती साकारताना त्यातील बारकावे आणि पाण्याच्या प्रवाहाचे दृश्य प्रभावीपणे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची उत्सुकता वाढली आहे.

Share

By kupe

You missed

error: Content is protected !!