कोगे फुटबॉल क्लब आयोजित डॉ. के. एन. पाटील चषक २०२५ उत्साहात : भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी संघाचा प्रथम क्रमांक

कोल्हापूर :

करवीर तालुक्यातील कोगे फुटबॉल क्लब यांच्या वतीने आयोजित डॉ. के. एन. पाटील चषक २०२५ ही भव्य फुटबॉल स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भैरवनाथ स्पोर्ट्स सावरवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या लढतीत कसबा बीड फुटबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला तर बालिंगा फुटबॉल संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानले.

यावेळी डॉ. के. एन. पाटील यांनी स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कोगे फुटबॉल क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंच, खेळाडू तसेच उपस्थित क्रीडारसिकांचे अभिनंदन व आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!