कुंभी कारखान्याची पहिली उचल ३५०० रुपये : आमदार चंद्रदीप नरके ( ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ )
करवीर :
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ काटा पूजन व गव्हाणीत मोळी टाकून कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके, व्हा. चेअरमन राहुल खाडे व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभप्रसंगी आयोजित समारंभात आमदार चंद्रदीप नरके यांनी ऊस उत्पादकांना चांगला ऊसदर देण्याची ‘कुंभी-कासारी’ची परंपरा असून, यापुढेही परंपरा कायम राहणार आहे. चालू हंगामात गाळपास उसास प्रति टन रुपये ३५०० पहिली उचल देणार असल्याचे सांगून कारखान्याचे हंगाम २०२५-२६ चे गळिताचे ७ लाख मे. टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कामगार प्रतिनिधी, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते
