गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अमृतमहोत्सवानिमित्त : म्हैशी व गाईंच्या  ‘आबाजी श्री’ स्पर्धा :   प्रथम,  द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यास ५१ हजार, ३५ हजार, २५ हजारांचे बक्षीस 

 कोल्हापूर  : गोकुळ दूध  संघाचे माजी चेअरमन व विद्यमान   ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण  पाटील यांच्या  अमृतमहोत्सवानिमित्त गौरव समितीच्या वतीने  गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादकांच्या जास्तीतजास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाई करिता  ‘आबाजी श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत  ‘आबाजीश्री’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

स्पर्धा ११ मार्च ते २० मार्च २०२५ या कालावधीत घेण्याचे ठरले आहे. सदर स्पर्धेत  सहभागी होणाऱ्या  दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटर हेडवर चेअरमन-सचिवांच्या सही शिक्क्यानिशी संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, उदगाव व ताराबाई पार्क येथील कार्यालयात  दहा मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस एक ते तीन क्रमांक व गाय एक ते तीन क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देऊन ‘आबाजीश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. म्हैस व गाय दुधासाठीचे पहिले बक्षीस प्रत्येकी ५१ हजार  रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ३५ हजार तर तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये आहे.  

Share
error: Content is protected !!