करवीर :

नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या,सरपंच व उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले आणि सरपंचपदी योगेश ढेंगे, उपसरपंचपदी शिवानी दिवसे यांची निवड झाली.निवडणूक अधिकारी सर्कल नामदेव जाधव यांनी काम पाहिले.

सरपंच पदासाठी योगेश ढेंगे यांना ८ मतदान पडले, विरोधी अमृता पोवार यांना ४ मतदान पडले,यावेळी ढेंगे यांना सरपंच मधून घोषित करण्यात आले.उपसरपंच पदासाठी शिवानी दिवसे यांना ७ मतदान पडले, विरोधी अभिजीत निगडे यांना पाच मतदान पडले, शिवानी दिवसे यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी सदस्य,
अभिजीत निगडे,
सुप्रिया कामीरे, बाळासो दिवसे,
उत्तम निगडे, करिष्मा माने, सविता दिवसे,
शरयू पाटील, प्रशांत शिंदे, रवींद्र पोतदार, सगुना बाटे,अमृता पोवार उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र दिवसे, राम पाटील, बाबू दिवसे, दिलीप दिवसे, सुभाष पाटील, पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!