शेत मालमत्ता खरेदी विक्री : शासकीय भरणा केल्यापासून चार महिन्यात कधीही दस्त नोंदणी

कोल्हापूर :

गेल्या काही दिवसांपासुन दस्त नोंदणीसाठी मालमत्ता खरेदीदारांची नोदंणी कार्यालयात गर्दी वाढत आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व्हरची गती कमी होऊन दस्त नोंद करण्यास वेळ लागत आहे. यामुळे 31 मार्च पूर्वी शासकीय चलनाचा भरणा झालेल्या दस्ताची नोंदणी पुढील चार महिन्यात कधीही सध्याच्या रेडिरेकनरच्या दरावर करता येते. जास्तीत-जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च अखेरीला गर्दी करु नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.

1 एप्रिल नंतर रेडीरेकनरच्या दरात वाढ होईल व मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) जास्तीची रक्कम भरावी लागेल या शक्यतेने मालमत्ता खरेदीदार 31 मार्चपूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई करीत आहेत. जे मालमत्ताधारक 31 मार्च 2022 पूर्वी दस्तांवर खरेदीदार व विक्रेत्याच्या स्वाक्षरी करणे (दस्त निष्पादन करून घेणे ), शासकीय चलनाचा भरणा( मुद्रांक शुल्क व नोदणी शुल्क) चलनाव्दारे 31 मार्च पूर्वी झाला असेल अशा दस्ताची नोंदणी दस्त नोंदविल्यापासून (निष्पादित केल्यापासून) पुढील चार महिन्याच्या आत सध्याच्या रेडीरेकनरच्या दरावर करता येते.

नवीन रेडीरेकनर लागू झाले तरी अतिरिक्त भुर्दंड लागणार नाही. तसेच पक्षकारांच्या सोईसाठी दररोज 1 ते 2 तासांनी वेळ वाढून देण्यात आली आहे, असेही श्री. माने यांनी म्हटले आहे.

Share

You missed

error: Content is protected !!