वाघजाई घाटात चालत्या कारचा
स्फोट

मुरगुड :

कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि.कोल्हापूर) जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतली.यावेळी गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत कोसळली.यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू
झाला. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले,घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली.
कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना समजली, पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता मृत्यू झालेल्या तरुणाच्या
मालकीची गाडी असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. घटनेची माहिती माजी सरपंच शिवाजी पाटील गोरंबे यांनी कागल पोलिसांना दिली. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहचले.

Share
error: Content is protected !!