शिंगणापूर शाळेत तातडीने दोन शिक्षक रुजू
होणार

करवीर :

शिंगणापूर ता . करवीर येथील प्राथमिक शाळेत जि.प. शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यानी शाळेत तातडीने सोमवार पासून दोन शिक्षक रुजू केले आहेत.तसेच क्रीडा प्रशाला सोमवारपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .

शिंगणापूर ययेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची रिक्त पदे होती. आणि क्रीडा शाळेतील कोव्हिड सेंटर बंद होते, याबाबत जि.प. शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांनी तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षणाधिकारी आशा उबाळे व आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी चर्चा केली.

रसिका पाटील म्हणाल्या की, शिंगणापूर शाळेत शिक्षकांच्या पाच जागा रिक्त होत्या. त्यापैकी दोन शिक्षक निवृत्त तर तीन जागा शिक्षकांना बढती मिळाल्याने रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन शिक्षक सोमवारपासून शाळेत रुजू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोव्हिड सेंटर बंद करून सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आरोग्य अधिकारी योगेश साळी यांना कोव्हिड सेंटर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!