प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर

मुंबई :

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या
विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले.

परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

परीक्षादरम्यान करोना नियमांचे पालन करण्यात येईल. तसेच परीक्षांसाठी दररोज ५० हजार संगणक उपलब्ध करवून देण्यात येतील. तसेच प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. तर, अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता. मात्र, सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

पुढील काही दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापुर्वी सांगितले होते. त्यानुसार आज तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Share

You missed

error: Content is protected !!