सामाजिक : सृष्टी डेव्हलपर्स अँन्ड बिल्डर्सच्या वतीने शिंगणापूर, कुडित्रे  कोविड केंद्रास औषधे प्रदान

करवीर :

पाडळी खुर्द ता.करवीर
येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. के एन पाटील यांनी शिंगणापूर व कुडित्रे येथील कोविड केंद्रास अत्यावश्यक असा औषधसाठा प्रदान केला.  यावेळी डाॅ के. एन. पाटील यांनी कोविड केंद्रास दिलेला आधार मोलाचा आहेच, शिवाय या कठीणकाळात कोरोना बाधितांना नव संजिवनी देणारा आहे, असे उदगार डाॅ. सूधीर राजदीप यांनी काढले.

जि. प. सदस्य सुभाष सातपूते यांचे हस्ते कोविड केंद्र येथील डाॅक्टर व सेवक यांचेकडे औषध साठा सुपूर्द करणेत आला.  यावेळी  मंडल अधिकारी सुहास घोंदे, तलाठी राजाराम चौगले, कोपार्डे तलाठी श्रीकांत भोसले,  सरपंच यूवराज पाटील कूडित्रे ,  सरपंच वसंत तोडकर वाकरे सरदार पाटील, यशवंत बॅंक संचालक एस. के .पाटील , धीरज पाटील  शिवाजी देसाई , आशिष सुतार,  उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!