लॉकडाऊन : आजच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरात नागरिकांचा  प्रतिसाद

कोल्हापूर :

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांचा  कडक लॉकडाऊन करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून कोल्हापूर मध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.  या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या आज पहिल्या दिवशी कोल्हापूर शहरात नागरिकांनी,आणि  ग्रामीण भागातही नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

सकाळपासून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते आज मोकळे पडल्याचे पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनला  नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.

पुढील आठ दिवस नागरिकांनी घरात राहून पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन  जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी केले  आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील साडेतीन हजार पोलीस  तसेच होमगार्ड, महापालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र रस्त्यावर तैनात असणार आहेत. जिल्ह्यातील गल्लीबोळात देखील पोलिसांनी चार्ली पेट्रोलिंग, बिट पेट्रोलिंग सुरू केले आहे.

कंट्रोल रूमची संख्या वाढवली असून, त्यातील मोबाईल नंबरची संख्यादेखील वाढवली आहे. नागरिकांन आपत्कालीन घटनेवेळी 100 या क्रमांकावर संपर्क करून मदत मागू शकतात.

Share
error: Content is protected !!